पावसाची दौलतबाजी


पावसाची दौलतबाजी सुरु होते तेव्हा,
असंख्य धारांनी नवं चैतन्य उधळल जातं.
प्राणी, पक्षी, वनस्पती सारेचं हरखून जातात,
भिजणार्‍या कणा-कणात उर्जा भारली जाते.
.
.
.
.
.
.
.
आपण मात्र बंदिस्त भितींच्या आडोश्याला लपून,
किती पाणी! किती चिखल! करत बसलेलो असतो.

यंदाच्या पावसाळ्यात, एक दिवस का होईना, आपण मनसोक्त भिजूयात.
ह्या चैतन्याच्या दौलतबाजीतून, आपण आपापला हिस्सा लुटूयात.

सगळ्यांना बरसत्या मान्सूनच्या खुप खुप शुभेच्छा!

पावसाची दौलतबाजी!