कधी न यावी वास्तवात,
ती स्वप्नामधली राणी,
कैद करावे तिला सर्वदा,
ह्रदयातल्या धमन्यानी
अंधुक व्हावे जग हे सारे,
अंतरात मी लीन असावे,
स्वप्न पाखरू तव होऊनी,
मी अंतर्मुख व्हावे
तिच्या रेशमी बंधामध्ये,
मज दुनियेचे भान नसावे,
अस्तित्वाला लाजवणारे,
स्वप्न लाघवी असे पडावे
मिटून जावे देहानिशी,
फक्त माझे स्वप्न जगावे,
प्रिया धडकते ह्रदयामध्ये,
ह्रदय तेवढे स्पंदत रहावे