पुन्हा पाऊस घेऊन आला,
गंध भिजल्या मातीचा,
त्या मातीवर नटलेला,
रंग हिरव्या झाडीचा
पुन्हा पाऊस घेऊन आला,
अस्तित्वाच्या नव्या रेषा,
नवे अंकुर, नवी पालवी,
नव्या वाटा, नव्या दिशा
पुन्हा पाऊस घेऊन आला,
चैतन्याची गहरी साद,
थेंबा-थेंबात संचारलेला,
रिमझिम-झरझर अल्लड नाद
पुन्हा पाऊस घेऊन आला,
बरसणार्या उत्कट सरी,
हातात-हात, चिंब भावना,
अवचित धडधड अंतरी
पुन्हा पाऊस घेऊन आला,
चैतन्याची गहरी साद,
थेंबा-थेंबात संचारलेला,
रिमझिम-झरझर अल्लड नाद
khup aawadale
Thanks Bro
पुन्हा पाऊस घेऊन आला,
चैतन्याची गहरी साद,
थेंबा-थेंबात संचारलेला,
रिमझिम-झरझर अल्लड नाद