रानमाथ्यावर सुर्य जेव्हा,
सोनं उधळीत असतो
तेव्हा अचानक कुठेतरी,
कोकिळ कुहकते
वारा स्थिरावतो, आणि
पानांची सळसळ थांबते
क्षणात सोनेरी सुर्यावर,
गर्द काजळी पसरते
अशा वेळी रानात,
एक विचित्र घटना घडते
उन-सावलिच्या पाठशिवणीत,
बरसात वैशाखि होते
Apr
24
2012