जातेयस? जा….
पण जाताना ते कवाड बंद करुन जा….
कोंडला श्वास माझा मुक्त केला होतास,
प्रकाश सोनेरी तु दावला होतास….
मोकळा श्वास परत एकदा कोंडुन जा….
परत एकदा सांद्र अंधार करुन जा….
जातेयस? जा….
पण जाताना ते कवाड बंद करुन जा….
तुझ्या सहवासाचे क्षण काही, घुटमळत आहेत मनात,
कणकण भारला आहे तुझ्या गंधात,
माझ्या मनाच्या वाटेवरच्या,
तुझ्या पाऊलखुणा पुसून जा….
जातेयस? जा….
पण जाताना ते कवाड बंद करुन जा….
शब्दांच्या कळ्या तुझ्या येण्याने,
उमलल्या होत्या काही….
जाताना कोमेजलेली ही फुले,
ओंजळीत घेऊन जा….
जातेयस? जा….
पण जाताना ते कवाड बंद करुन जा….
Hmmmmmmm………..
Mangya … evadha sarv tras ghetlyavar .. ek ajun tras ghe … thoda uth ani apla kavad tuch band kar …. mhanje khatri tari rahil neet band zala, dusryavar vishwas thevshil tar neet band hi nahi karnar …. ani madhech kadhi parat yeun parat navi umed dakhavun .. punha asach tras denar …