स्थळ : भवानि लंच होम.
वेळ : १४ फेब्रुवारी रात्रीचे ९.
आम्ही जेवत होतो. तिथे एक माणुस(३०-३५ वर्ष) आणि त्याच्यासोबत २ स्रिया आल्या. वयानुसार एक त्याची आई (६५-७० वर्ष) होती आणि एक नक्कीच बायको (२५-३० वर्ष). सुनेने तिच्या सासूला बसवलं,
सुनः क्या खायेंगी आप?
सासू: (आधीच जेवणाला उशिर झालेला म्हणून रागात दिसत होती)कुछ भी बोल दे.
सुनेने सरळ थाळीची ऑर्डर दिली, थाळी सासूच्या टेबलावर पोहोचल्यावर,
सुनः हम खाना खाके आये है, तो बाहर रुकते है.
सासू काहीच बोलली नाही. मग मुलगा आणि सुन बाहेरे गप्पा मारत बसले.
जेवताना त्या म्हातारीच्या चेहर्यावरचे करुण भाव खुप काही सांगूण गेले.
सुनेचं एक समजू शकतो. पण मुलगा लहान असतो तेव्हा त्याची आई प्रेमाने त्याला भरवते. तो मोठा झाल्यावरही तो जेवत असताना सोबत बसून असते, काय हवं नको ते विचारते. १४ फेब्रुवारी प्रेमाचा दिवस, म्हणुन जेवले असतील दोघे बाहेर, पण म्हणून काय जन्मदात्रीसाठी थोडा वेळही काढू शकु नये. तिच्या प्रेमाची थोडीही परतफेड तिला मिळू नये….
प्रेम म्हणजे फक्त प्रेयसी/बायको यांपुरतं मर्यादित कसं असू शकतं? आणि प्रेम जरी अनमोल असलं, तरी ते व्यक्त करणं एवढं महाग/कठीण तेही आपल्या माणसांसाठी, कधीच नसावं, असं मला वाटतं.
khar aahe,