रिमझीम सरी पावसाच्या,
उत्तुंग भावना मनाच्या…
पाऊस हा प्रेमाचा ऋतू आहे. पहिला पाऊस गारव्यासोबत प्रेमाचे थंड वारेही आणत असतो. पावसाळ्यात बागेत जशी विविधरंगी फुले फुलू लागतात, तशीच बरिच ह्रदये प्रीतीचा रंग धरून नवी स्वप्ने बघू लागतात. ग्रीष्मात तापलेली पृथ्वी जशी पावसाने गार होऊ लागते, तशीच बरेच दिवस प्रेयसिच्या/प्रियकराच्या शोधात असणारे अचानक ते भेटल्याने हर्षून जात असतात. तिच्यासोबत/त्याच्यासोबत पावसात भिजणे हि एक सवय होऊन जाते. मग उगाचच भिजल्या अवस्थेत तिने रस्त्यावरच्या कांदा-भजीसाठी आग्रह धरावा आणि मग दोघांनी मुद्दाम एकच प्लेट कांदा-भजी शेअर करून खावी, असे गमतीदार खेळ सुरु होतात. तिच्या भिजल्या केसातुन येणारा सुगंध तो आयुष्यभरासाठी साठवून ठेवू पाहातो आणि अचानक कडाडलेल्या विजेला घाबरूण तिने त्याला मारलेली मिठी आणि त्या मिठीत सामावलेलं अभय तिही कुठेतरी मनाच्या कोपर्यात साठवू पहात असते.
असा हा प्रेमाच्या उगमाचा ऋतू तुमच्याही आयुष्यात असंच कुणीतरी “स्पेशल” घेऊन येवो हि सदिच्छा.
पहिल्या पावसाच्या अनेक शुभेच्छा.
Jun
4
2011