रेत के मकान


रेत के मकान तो हम भी बनाते थे समुंदर किनारे,
पर लहरोंको शायद वो मंजूर न था,
सपनोंकी शायद, नींव कमजोर थी हमारे,
लहरों का तो सिर्फ इक बहाना ही था

फिर आज हमने ठाना है दिलसे,
हम बनायेंगे इक आशियाना सुहाना,
अब टकरायेंगे हमारे अरमान लहरोंसे,
न चलेगा कोइ बुज्दिल बहाना पुराना

मुंडके नसलेली माणसे


मुंडके नसलेली माणसे
मी रोज पहात असतो

अशी माणसे भल्या पहाटे उठतात
ट्रेनच्या गर्दीत स्वतःला कोंबतात
ऑफिसाला उशिर झाल्यास मॅनेजरला विनवतात
अन रोजच्याच खूर्चित जाऊन बसतात
अशी मुंडके नसलेली माणसे
मी रोज पहात असतो
अन खबरदारीदाखल
स्वतःचे मुंडके तपासत असतो

अशी माणसे गर्दीत, गोंधळात स्वतःला विसरतात
बाजारात फिरताना, आज काय, उद्या काय हिशेब करत बसतात
काही हरविल्यास ही माणसे दु:खी होतात
अन काही मिळाल्यास वेड्यागत उड्या मारतात
अशी मुंडके नसलेली माणसे
मी रोज पहात असतो
अन खबरदारीदाखल
स्वतःचे मुंडके तपासत असतो

अशी माणसे शेजार्‍यांशी बोलत नसतात
स्वतःच्या घरात प्रायव्हसी जपतात
ते कधीच प्रेमात पडत नसतात
कारण भावना त्यांना थोड्या खर्चिक वाटतात
अशी मुंडके नसलेली माणसे
मी रोज पहात असतो
अन खबरदारीदाखल
स्वतःचे मुंडके तपासत असतो

अशा माणसांना मित्र नसतात
त्यांना फक्त कामाचिच माणसे भेटतात
अशी माणसे चालताना एकटिच चालतात
अन वागताना सर्वांशी प्रोफेशनल वागतात
अशी मुंडके नसलेली माणसे
मी रोज पहात असतो
अन खबरदारीदाखल
स्वतःचे मुंडके तपासत असतो

अशा माणसांना चेहरे नसतात
म्हणूनच जगात ते गणले जात नसतात
अशी माणसे निरस, बेचव जीवन जगतात
अन असेच केव्हातरी-कुठेतरी ते मरतात
अशी मुंडके नसलेली माणसे
मी रोज पहात असतो
अन खबरदारीदाखल
स्वतःचे मुंडके तपासत असतो

स्मशान शांतता


आज नविन सोबती मिळाला
जळता-जळताच “येतो” म्हणाला
सरणावरची लाकडे सरली
अन बैठकीत सामिल झाला

आज स्मशान शांत होते
अशाने तो गहिवरला
म्हणाला आठवण येतेय तिची
अन धाय मोकलून रडला

मलाही तूझी आठवण आली
पण रडण्याचा मोह आवरला
आठवणींत रमलो आणि
पहिल्या भेटीचा दिवस आठवला

नखशिखांत भिजलेली तू
अन मीही भिजलेला
रस्त्यावरच्या टपरिवरचा
तो चहा आपण प्यालेला

विसरली तर नाहिस ना
तो गजरा मी माळलेला
कोमेजलेला असून सुध्दा
सूगंध त्याचा दरवळलेला

तुझे हासणे मंतरलेले
अन त्यातच मी हरवलेला
कित्येक तास तुझ्यासोबत
ग्प्पांमध्ये रमलेला

चांदण्यांसम तुझे तेज
तो चंद्र तुला लाजलेला
रात्र काजळी तुझ्या डोळ्यात
अन मांडीवर मी निजलेला

पाठमोरी तुझी आकृती
मी सरणावर पडलेला
अग्नीडाग देताच
तुझ्याभोवती घुटमळलेला

एकेक क्षण तसाच आहे
मनात माझ्या जपलेला
मरण्याआधी-मरण्यानंतर
तुझ्यासोबत जगलेला

आज स्मशान नेहमीसारखेच
शांत-शांत होते
अन मी तुझ्या आठवणींत
पुन्हा एकदा गहिवरलेला!

रहस्य


कुणाचे बंध-निर्बंध नसलेला तो सूर्यराज,
उगवतो मावळतो कटाक्षाणे.सूर्य
जणू यूगानुयूगे
कुणाची वाट पाहतो आहे.
प्रकाशाने झापून सारी स्रुष्टी,
शोधात तो फिरत आहे.
कसल्याशा आशेने तो
उगवत असतो,
तर निराशेने,
मावळत असतो.
काय ते रहस्य?
जे मनात तो जाळत आहे.
किरणांच्या तलवारिने जणू,
युध्दास तो सज्ज आहे.
न जाणे कुणास तो,
जिंकण्यास उद्विग्न आहे.

पत्र


बाहेरगावी शिकत असताना, वडिलांना उद्देशून कागदावर उतरवलेल्या भावना, पत्ररूपात (ता. ०५/०७/२००४)…

प्रिय पप्पा,

तुम्ही सोबत नसतांना, माझ्या जीवनाच्या वाटेवरील,
सारेच दिवे मला मालवलेले आढळतात,
पण तुम्ही दिलेली संस्कारांची विजेरी
मी नेहमीच सोबत बाळ्गतो.
मी एकटा असतांना मला अनेक अडचणी येतात,
पण मी न घाबरता त्यांना सामोरा जातो.
पण तरीही एकांतात विचार केल्यास,
तुम्ही सोबत असावेत असेच वाटते,
व अशातच रडायला होते.
पण रात्री स्वप्नात येवून
तुम्ही माझी समजूत घालतात.
पून्हा रडलास तर येणार नाही असे सांगतात.
पण जेव्हा गावी तुम्हास भेटण्यास येतो,
तेव्हा आनंद द्विगूणित होतो.
सारं काही तुम्हास सांगून मन मोकळं होतं.
गावी तुमच्या कुशीत छान झोप येते.
पण पून्हा तुम्ही तिथे नसणार म्हणून मन भरून येतं.
मग परत जाण्याचा दिवस येतो,
मी मोठ्या धैर्याने तेथून निघतो,
कारण तुम्हीच सांगितलेले,
“ध्येय तुझे सार्थ कर, खंबीर रहा”,
असे शब्द मनात गुंजत असतात.
असाच माझ्या वाटेवर,
मी पडत-पडत घडत आहे,
तुम्ही माझी काळजी करू नका,
मी माझ्या ध्येयासाठी खंबीर आहे.

Thumbs up