माझ्या गावाकडे


पहाटेचा सूर्य किती गोड दिसतो माझ्या गावाकडे,
सांजसुर्य लाल गुलाल उधळीत असतो माझ्या गावाकडे,
आजही तो मंद वारा मंजुळ गीत गात असेल का?
आजही ती उदास रात्र आठवण माझी काढत असेल का?

तू


तू दिव्य तारका माझ्या हृदयातली,
भव्य दालनात तेवत ठेवलेली,
काळजातली सुप्त कुपी तू,
मंत्रमुग्ध-सुगन्धित करणारी,

तू स्वैर-स्वच्छंदी पवन भिंगरी,
मज सैर-वैर करणारी,
सप्तरंगाची इंद्रधनू तू,
माझे आयुष्य रंगवणारी.

उधळून टाकीन् डाव मांडलेला


उधळून टाकीन् डाव मांडलेला
मी स्तब्ध नव्हे, मी चिडलेला
रोजचिच ती चूकार स्वप्ने
मज दिवसालाही सतावती
नसनसात भिनती अन्
नयनपटलावर लकाकती
कळकटलेला मी, मी बूरसटलेला
मज पून्हा-पून्हा का पूकारती
मी नसे कूणी जरी रंगकर्मी
मज आयूष्याचे रंग दाविती

स्वैर माझी जाणिव
जणू लकेर आकाशातली
क्षणात करते माझा
सोक्षमोक्ष वास्तवाशी
हतबल मी, मी दूर्बल
मज उद्विग्न ती का करते
मी नसे कूणी जरी विद्वान योगी
मज जीवनाचे मर्म सांगते

अश्याने, पेटून उठेन मी,
अन् उधळून टाकीन् डाव मांडलेला,
मी स्तब्ध नव्हे, मी चिडलेला.

चूल


आयूष्याच्या चूलित
प्रयत्नांची लाकडे जळत असतात,
ती लाकडे जेवढी अधिक जाळलित
तेवढा नशिबाचा जाळ वाढत असतो.
यश मात्र त्या निळ्या जाळासारखे असते
कधी येते, कधी येत नाही.
जाळाची उब जरी आपली असली,
तरी त्यावर दूसय्राचीच पोळी भाजली जात असते.
प्रयत्नांची लाकडे अपूरी पडल्यास,
आयूष्याची चूल विझत जाते.
आणि शेवटी उरते ती फक्त,
मृत्यूची राख !

माझ्या भरकटलेल्या मना


माझ्या भरकटलेल्या मना,
उगाच संचारतो धुंद भावना,
ती नव्हतीच कधी सोबती तुझ्या,
उगाच शोधीतोस तिच्या पाऊलखुणा,

बेभान वाऱ्याच्या सोबतीस,
बसतोस एक़टा निशब्द,
विस्मृतित तिच्या तू कधीचा,
उगाच आठवतोस तिचेच शब्द,

प्रीत ना कळली तिला कधी,
फुका तुझे ते प्रयास गेले,
आजवरीच्या प्रेमापोटी,
रंग ऋतूंचे हजार गेले.